चल गं मयूरी

3:38 AM 0 Comments A+ a-

तुषार उधळीत मोत्यांचे
आले मेघ गगनी

चल गं मयूरी
आज नाचू या कुंजवनी.
पदन्यास कर सुरु
आज आले सृष्टी संगीताचे गुरु
वाऱ्याचे संगीत, ढगांचे वादन
संगे विज राणीचे ताल स्मरू
फुलवू पिसारा
मोत्यांचे तुषार झेलू
मखमली या पिसाऱ्यावर फुलवू
माणिक, पाचू आणि निलू
मियावो मियावो गाऊ
दोघे पावसात न्हावू

चल गं मयूरी
आज राधेशाम सम
रास रंग रचू .