ढग
तो सूर्य सुद्धा
तीच्या रागाला घाबरून
तुझ्याआड लपून बसतो .
मग तीच्या रागाला सामोरा
मी तुला करतो.
मी तुला विनवितो,
तीची समजूत काढ म्हणून.
कारण माझ्यात ती हिम्मत नसते.
तू हसतोस,
का ते मला कळत नाही.
ती दूर त्या खडकावर
रागावून बसलेली.
या रागाच्या भरात
तीचा आधी कटाक्ष माझ्याकडे
नंतर तुझ्याकडे.
मग तुझी रिमझिम
सुरु होते.
त्या रिमझिमणाऱ्या सरींबरोबर
तीचा राग ओसरताना
मी पाहतो. .
ती धावत येवून मला बिलगते.
मग मी तुझ्याकडे पाहून हसतो.
पण अचानक ……
तुला काय सुचत
कुणास ठाऊक ?
तू रिमझिम बंद करतोस
आणि हसतोस.
एव्हाना तीच्या रागाचा पारा
पुन्हा चढलेला असतो
मला एकट्याला सोडून
ती निघून जाते.
आता माझ्या रागाचा
पारा चढलेला असतो.
मी तुला शिव्यांची
लाखोली वाहतो.
तुझी खांडोळी करीन म्हणतो.
अजुन थोडा वेळ असाच
बरसत राहिला असतास
तर तुझं काय कमी झालं असतं.
तू हसतोस.
मला म्हणतोस
अरे तुम्हांला प्रेम करायला
प्रेमाचा क्षण तरी मिळतो
आम्ही मात्र
प्रेमाच्या शोधात
असेच इकडे-तिकडे भटकत असतो.
---------------------------------------
कवी : निलकवी
तीच्या रागाला घाबरून
तुझ्याआड लपून बसतो .
मग तीच्या रागाला सामोरा
मी तुला करतो.
मी तुला विनवितो,
तीची समजूत काढ म्हणून.
कारण माझ्यात ती हिम्मत नसते.
तू हसतोस,
का ते मला कळत नाही.
ती दूर त्या खडकावर
रागावून बसलेली.
या रागाच्या भरात
तीचा आधी कटाक्ष माझ्याकडे
नंतर तुझ्याकडे.
मग तुझी रिमझिम
सुरु होते.
त्या रिमझिमणाऱ्या सरींबरोबर
तीचा राग ओसरताना
मी पाहतो. .
ती धावत येवून मला बिलगते.
मग मी तुझ्याकडे पाहून हसतो.
पण अचानक ……
तुला काय सुचत
कुणास ठाऊक ?
तू रिमझिम बंद करतोस
आणि हसतोस.
एव्हाना तीच्या रागाचा पारा
पुन्हा चढलेला असतो
मला एकट्याला सोडून
ती निघून जाते.
आता माझ्या रागाचा
पारा चढलेला असतो.
मी तुला शिव्यांची
लाखोली वाहतो.
तुझी खांडोळी करीन म्हणतो.
अजुन थोडा वेळ असाच
बरसत राहिला असतास
तर तुझं काय कमी झालं असतं.
तू हसतोस.
मला म्हणतोस
अरे तुम्हांला प्रेम करायला
प्रेमाचा क्षण तरी मिळतो
आम्ही मात्र
प्रेमाच्या शोधात
असेच इकडे-तिकडे भटकत असतो.
---------------------------------------
कवी : निलकवी
