लिहितो मी, असेच कधीतरी काहीतरी....

3:26 AM 0 Comments A+ a-

लिहितो मी, असेच कधीतरी काहीतरी……  

दिक्कालांतून पार जात
काळ -वेळेचे तोडून बंधन 
ब्रह्मांड पालथा घालतो 
विश्वातल्या प्रत्येक अणुरेणूत जाऊन
स्वतःला हरवून……

कधी-कधी उसळतात रक्तांचे फवारे 
वाहू लागतात बेधुंद होऊन नसानसात. 
प्रकाशाच्याही वेगापेक्षा कैकपटीने 
त्या हृदयाला भिडायला
मनातून हद्दपार झालेल्या
माणसातल्या माणुसकीला शोधायला…. 

लिहितो मी, असेच कधीतरी काहीतरी……  

----------------------------------------------------
कवी : निलकवी