एक वादळाची वाट

5:31 AM 0 Comments A+ a-

एक वादळाची वाट
       तीच्या मनातून जाते.
झंझावात सारा येता
       मना काहूर माजते.
फुल नाजूक नाजूक
       गंध उधळीत होते.
गंधासाठी भ्रमराज
       तीले विनवीत होते.
मन अजाण अजाण
      प्रेमा भुकेले भुकेले.
मन कवाडे कवाडे
      तीने खोलले खोलले.
आला आला भ्रमराज
      गंध चोखोनीया गेला.
काळ लोटला लोटला
      नाही पुन्हा फिरकला.
मन  नाजूक नाजूक
      नाही झाले ते सहन.
मनी वणवा पेटला
      दाह झाडाले ते झाला.
झाडावरली हो पाने.
      झाली बुंध्याशी हो गोळा.
आता आठवण येता.
      पालापाचोळा उडतो.
झंझावात सारा येता
      मना काहूर माजते.
एका वादळाची वाट.
      तीच्या मनातून जाते.       
  
------------------------------------
कवी : निलकवी