रखंरखंत ऊन बाहेर असून ……
रखंरखंत ऊन बाहेर असून ……
मनातलं रखंरखंतसोसून सोसून
बाहेरचं ऊन जाणवना.
झोळीतल मुल रडून रडून
त्या मायेच काळीज गेलंय जळून
पोटच्या पोराला पाजवना
भट्टीच काम अजून थांबना.
डोक्यावरच्या विटा पोचवायच्या आहेत
दिवसाच्या मजुरीवर घर चालवायच आहे
घामाच्या धारा वाहतच आहेत
मायेच्या अन कोवळ्या जीवाच्या पोटात
काव काव चालूच आहे
तरी…….
भट्टीच काम अजून थांबना
भट्टीच काम अजून थांबना…….
मायेच्या जीवाला आता राहवाना
पोटचं हम्बरण आता बघवना
मायेच काळीज……
सोडून काम…कवटाळलं काळजाशी
थांबल हम्बरण.
त्या अमृताला ही या दुधाची सर येईल का?
मायेचा जीव पोराला पाजल्याशिवाय राहील काय?
रखंरखंत ऊन बाहेर असून ……
मनातलं रखंरखंतसोसून सोसून
बाहेरचं ऊन जाणवना.
मनातलं रखंरखंतसोसून सोसून
बाहेरचं ऊन जाणवना.
झोळीतल मुल रडून रडून
त्या मायेच काळीज गेलंय जळून
पोटच्या पोराला पाजवना
भट्टीच काम अजून थांबना.
डोक्यावरच्या विटा पोचवायच्या आहेत
दिवसाच्या मजुरीवर घर चालवायच आहे
घामाच्या धारा वाहतच आहेत
मायेच्या अन कोवळ्या जीवाच्या पोटात
काव काव चालूच आहे
तरी…….
भट्टीच काम अजून थांबना
भट्टीच काम अजून थांबना…….
मायेच्या जीवाला आता राहवाना
पोटचं हम्बरण आता बघवना
मायेच काळीज……
सोडून काम…कवटाळलं काळजाशी
थांबल हम्बरण.
त्या अमृताला ही या दुधाची सर येईल का?
मायेचा जीव पोराला पाजल्याशिवाय राहील काय?
रखंरखंत ऊन बाहेर असून ……
मनातलं रखंरखंतसोसून सोसून
बाहेरचं ऊन जाणवना.
