अंगणी बकुळी- प्राजक्तांचे सडे

5:04 AM 0 Comments A+ a-

कड्या- कड्यातून
अवखळ खळखळ
वाहती निर्झर झरे
नादही घुमे सप्तसुरांचा
ताल ही वारा धरे

मृदगंध येथला
धुंद होऊनी
दशदिशा सुवासिक करे

राशी फुलांची अवनीवरती
जणू नक्षी पुष्पांची पडे
वेचण्या ललनांचे पाऊल पडे
अंगणी बकुळी- प्राजक्तांचे सडे.

---------------------------------------
कवी - निलकवी