कारण

12:08 AM 0 Comments A+ a-

कारण


शामरावांना त्या दिवशी घरी यायला चांगलाच उशीर झाला होता. घरी येऊन पाहतात तर मालतीबाईंचे डोळे रडून सुजले होते. शामराव म्हणाले, 'एवढं रडायचं काय त्यात? मला काय पहिल्यांदा उशीर झाला की काय?' हुंदके आवरत त्या म्हणाल्या, 'नेहमीची गोष्ट वेगळी असते हो. आज शेजारी बोलत होते की, एक वेडसर माणूस ट्रकखाली आला म्हणून... तेव्हापासून माझी काय अवस्था झाली, तुम्हाला काय माहीत!'.

----------------------------------------------------------------------------------