उष्मा

1:02 AM 0 Comments A+ a-

अंगाची लाही
सुचेना काही
उन्हानं भाजल्या
दिशा या दाही…

दाही या दिशा
काय सांगू दशा
सर्वांची झालेया
पहा कशी दुर्दशा.....

दुर्दशा माणसांची
पशु अन पक्ष्यांची
उघडया या डोंगराची
सुकलेल्या झाडांची.....

झाडांची सावली
उन्हानं चोरली
उष्ण झळी उन्हाची
त्यातच विसावली.....

विसावली माणसे
मग घराघरातच
पशु पक्षीही सारे
झाले कुठे अदृश्यच.....

अदृश्य ढग मग कसे दिसावेत
मेघांचे कुंभ कधी बरसावेत
हैराण या सृष्टीला
मग घे कवेत.....

कवेत घे
शितलता दे
हिरवळीचा शालू
या  सृष्टीला दे......

देल सृष्टी ग्वाही
माझ्या अंगाची लाही
आता नाही काही
सुचेल मग सर्व काही....... 

----------------------------------
कवी : निलकवी