हे माते! सारस्वते.

2:14 AM 0 Comments A+ a-

लेखणी जी कालीच्या जिव्हेपरी
आसूसली जी दुष्टांच्या रक्तावरी
अशी…….                

हे माते! सारस्वते, 
दे तुझी ओजस्वी लेखणी माझीये कराते

हे माते! सारस्वते,
तव स्फूर्तीने
प्रत्स्फुर्थ होवूनी
उत्स्फूर्त मनी 
स्फ़ुर्तिल जे दिव्य काव्य 
तुझीच वाणी ती 
लिहीन स्वकरांनी 
तुझीया लेखणीने . 

हे माते! सारस्वते, 
अन्याया उकराया 
मोडूनी टाकाया 
दुष्टांसी  माराया 
भोळ्या जनांसी ताराया
अन सत्य वचन लिहिण्यासी 
तुझ्या कृपेचा वरदहस्त 
असुदे माझीये माथी 
अन तुझी दैवी लेखणी 
असू दे 
सदैवं माझीये  कराते

---------------------------------------------
कवी : निलकवी